रणदीप हुड्डा ते ललित मोदी...सुश्मिता सेनने ‘या' श्रीमंत उद्योजक ते प्रसिद्ध सिलेब्रिटींना केले डेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 01:05 PM2023-11-19T13:05:04+5:302023-11-19T13:39:11+5:30

आज सुश्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनचा आज 48 वा वाढदिवस आहे. प्रोफेशनल लाईफबरोबरच सुश्मिताही तिच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिली.

सुश्मिता सेनचं नाव अभिनेते, दिग्दर्शक आणि उद्योगपतींशी जोडले गेले आहे. सुश्मिता सेन ही अजूनही अविवाहित आहे.

मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (1996) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

रणदीप हुड्डाही सुश्मितासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होता. कर्मा, कबुलीजबाब आणि होळी या चित्रपटात एकत्र काम करताना दोघेही जवळ आले होते.

2013 मध्ये सुश्मिता आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघेही लग्न करणार असल्याचेही म्हटले जात होते.

सुश्मिता मुंबईस्थित रेस्टॉरेंट हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांच्याशीही सुश्मिताचं नावं जोडलं गेलं होतं. सुश्मिताने मुदस्सर यांच्या ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला.

मॉडेल रोहमन शॉल आणि सुश्मिता 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, २०२१ मध्ये सुश्मिताने रोहमन शॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली होती.

यानंतर अभिनेत्री सुश्मिता सेन आणि उद्योजक ललित मोदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी खळबळ माजली होती. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ललित आणि सुश्मिता यांच्या खासगी फोटोंची चर्चा होती. दोघांनी लग्न केल्याची चर्चा देखील सर्वत्र रंगली होती.

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल हे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे म्हटले जात आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

सुश्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिची 'आर्या ३' ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजत आहे. आर्या’ सीरिजचे पहिले दोन सीझन देखील चाहत्यांना प्रचंड आवडले होते.