Flashback 2025: धर्मेंद्र ते शेफाली जरीवाला; २०२५मध्ये बॉलिवूडवर काळाचा घाला, गमावले दिग्गज हिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:52 IST2025-12-26T09:58:49+5:302025-12-26T10:52:03+5:30

२०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी दु:खाचं ठरलं. या वर्षात बॉलिवूडने अनेक हिरे गमावले. कोणाचं वृद्धपकाळाने, तर कोणाचं अकाली निधन झालं. ज्यामुळे बॉलिवूड शोकात बुडालं.

२०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी दु:खाचं ठरलं. या वर्षात बॉलिवूडने अनेक हिरे गमावले. कोणाचं वृद्धपकाळाने, तर कोणाचं अकाली निधन झालं. ज्यामुळे बॉलिवूड शोकात बुडालं.

कॉमेडीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते गोवर्धन असरानी यांचं ८४व्या वर्षी निधन झालं. २० ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं १५ ऑक्टोबर रोजी कॅन्सरने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते.

दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांनी ४ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली.

बॉलिवूड सिंगर झुबीन गर्ग यांच्या निधनाची बातमी हादरवून सोडणारी होती. १९ सप्टेंबरला सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू हा घातपात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

२५ ऑक्टोबरला चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेता सतीश शाह यांचं मूत्रपिंडाच्या त्रासाने निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.

२०२५ सरता सरता दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. २४ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांचं निधन झालं. ८९ वर्षांच्या धर्मेंद्र यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २७ जूनला कार्डियक अरेस्टमुळे शेफालीचं निधन झालं. ती फक्त ४२ वर्षांची होती.