प्रभुदेवासह लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने नावात बदल केला,धर्मही बदलला,तरीही झाले ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:06 IST2021-06-13T18:51:13+5:302021-06-13T19:06:48+5:30
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. डांस गुरु 'प्रभुदेवा'लाही त्याच्या प्रेमात अपयशच मिळाले.

नयनतारा आणि प्रभूदेवा यांचे एकेकाळी अफेअर प्रचंड गाजले होते.
२००८ साली सुरु झालेली या दोघांची लव्हस्टोरी प्रचंड गाजली.
दोघेही आकंत एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते.
विशेष म्हणजे प्रभुदेवा विवाहीत असतानाच नयनतारासह त्याचे अफेअर सुरु झाले होते.
नयनतारासह लग्न करण्यासाठी नको नको त्या गोष्टी प्रभुदेवाने केल्या होत्या.
प्रभुदेवाने पत्नीलाही नयनतारासाठीच घटस्फोटही दिला होता.
तर दुसरीकडे नयनतारादेखील प्रभुदेवाच्या प्रेमात बुडाली होती.
ख्रिश्चन धर्मात जन्मलेल्या नयनताराने हिंदु धर्माचा स्विकार केला.
डायना मरियन कुरियन हे तिचे खरे नाव होते.
नावातही बदल करुन तिने नयनतारा असेही ठेवले.
पुढे याच नावाने ती इंडस्ट्रीतही प्रसिद्ध झाली.
नयनतारा आणि प्रभुदेवा लिव्ह इनमध्ये राहायला लागले होते.
काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.