'रा-वन' सिनेमातील हा चिमुकला आठवतोय का?, १२ वर्षांनंतर आता त्याच्या लूकमध्ये झालाय खूप मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:17 IST2025-03-08T17:12:42+5:302025-03-08T17:17:18+5:30

Ra-One Movie : 'रा-वन' चित्रपट प्रदर्शित होऊन १२ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि आता जर तुम्ही अरमान पाहिलेत तर तुम्ही त्याला अजिबात ओळखू शकणार नाहीत. त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.

शाहरुख खान आणि करीना कपूर यांचा रा वन हा चित्रपट २०११ साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही आणि फ्लॉप झाला.

या चित्रपटात बालकलाकार अरमान वर्माने शाहरुख खान आणि करीना कपूरच्या मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अरमान लांब केसांसह खूपच गोंडस दिसत होता.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन १२ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि आता जर तुम्ही अरमान पाहिलेत तर तुम्ही त्याला अजिबात ओळखू शकणार नाहीत. त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.

अरमान वर्मा जेव्हा रा वन चित्रपटात दिसला तेव्हा तो १२ वर्षांचा होता. आता तो २४ वर्षांचा असेल. १२ वर्षांत अरमानचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याचा फोटो पाहिल्यास त्याला ओळखणे कठीण होईल.

सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबासोबतचे काही फोटो आहेत जे पाहिल्यानंतर ओळखणे कठीण आहे. अरमान आपल्या कुटुंबासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर नाही तर फेसबुकवर शेअर करत असतो.

अरमानने करीना आणि शाहरुखचा मुलगा प्रतीकची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो अर्जुन कपूरसोबत ॲक्शन सीन करतानाही दिसला होता. हे लहान मूल आता मोठे झाले असून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

रा.वननंतर अरमान अभिनयापासून दूर राहू लागला. आता अरमानने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळे चाहत्यांना त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. मात्र, अनेकवेळा तो फोटो शेअर करतो, जे पाहून त्याचे चाहते खूप खूश होतात.