पार्टी, ड्रिंक अन् १४व्या मजल्यावरुन उडी! आत्महत्येनंतरही जिवंत होती दिशा सालियन, पण...; नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:27 IST2025-03-20T14:21:53+5:302025-03-20T14:27:19+5:30
१४व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतरही दिशा जिवंत होती, असा खुलासा तिच्या एका मित्राने केला होता.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनने लॉकडाऊनमध्ये ९ जून २०२१ रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं. पण, या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे.
दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करत दिशावर सामुहिक बलात्कार झाल्याचं म्हणत या प्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशी करावी, असं म्हटलं आहे.
तसंच या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही आरोप केले आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिशाने ९ जून २०२१ ला मुंबईतील मालाडमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. तिने १४व्या मजल्यावरुन उडी मारली होती. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता.
पण, १४व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतरही दिशा जिवंत होती, असा खुलासा तिच्या एका मित्राने केला होता.
दिशा सालियनने आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, ते मित्राने सांगितलं होतं.
ज्या रात्री दिशाने आत्महत्या केली त्यावेळी ती काही मित्र आणि बॉयफ्रेंड रोहनसह पार्टी करत होती.
दिशा पार्टीत दारूही प्यायली होती. पार्टी सुरू असतानाच तिने मध्येच "कोणालाच माझी काळजी नाही" असं म्हणत स्वत:ला बेडरुममध्ये बंद करून घेतलं होतं.
बराच वेळ दिशा बाहेर न आल्याने मित्र आणि बॉयफ्रेंडने दरवाजा ठोठावला. पण, दिशाने काहीच प्रतिसाद न दिल्याने त्यांना नाईलाजाने दरवाजा तोडावा लागला.
बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना धक्का बसला. कारण, दिशाने बाल्कनीतून खाली उडी मारली होती. हे कळताच ते ताबडतोब जिन्याने खाली उतरले.
तोपर्यंत वॉचमॅनने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. जेव्हा दिशाला तिच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा ती जिवंत होती.
मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असं दिशाच्या मित्राने सांगितलं होतं.