Disha Patani Birthday Special: दिशा पटानीचा हा बीच लूक पाहून म्हणाल कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 18:30 IST2020-06-13T18:30:20+5:302020-06-13T18:30:20+5:30

'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे. दिशाने खूप कमी वर्षांत खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळवले आहे.

दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

धोनी या चित्रपटातील दिशाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं.

'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती.

दिशा नुकतीच मलंग या चित्रपटात झळकली होती. आता ती सलमानच्या राधे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे बिकनीतील अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

दिशा तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबत तिचे अफेअर असल्याची चर्चा नेहमीच मीडियात ऐकायला मिळते.

दिशा आणि टायगरच्या अफेअरची चर्चा होत असली तरी ते दोघे केवळ फ्रेंड्स असल्याचे ते आवर्जून सांगतात.

दिशाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.