सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर बघून फॅन्स झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 18:02 IST2020-07-06T18:02:57+5:302020-07-06T18:02:57+5:30

सुशांतसिंग राजपूत आणि संजना सांघी स्टारर सिनेमा 'दिल बेचारा' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
सुशांत सिंग राजपूतचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत होते.
'दिल बेचारा' च्या निर्मात्यांनी 6 जुलैला म्हणजे आज सिनेमाचा ट्रेलर रिलीज करणार असे सांगितले होते.
चित्रपटाच्या ट्रेलरला घेऊन फॅन्स खूपच उत्साही होते.
सकाळपासूनच लोक सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची वाट पाहत होते. ट्विटरवर सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघी स्टारर या चित्रपटाच्या नावाचा हॅशटॅग जबरदस्त ट्रेंड करत आहे.
ट्विटरवर #DilBecharaTrailer टॉप ट्रेंड करतो आहे.
सिनेमाचा ट्रेलर पाहताना काही फॅन्स इमोशनल झाले. सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना त्यानी अनेक इमोशनल पोस्ट लिहिल्या.