‘दिल बेचारा’ सिनेमातील आईचे ख-या आयुष्यातील फोटो पाहून बसेल धक्का, आहे इतकी हॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 12:24 IST2020-07-31T12:10:28+5:302020-07-31T12:24:20+5:30
रिअल लाईफमध्ये अशी दिसते स्वस्तिका

‘दिल बेचारा’ हा सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा. या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटासोबतच चित्रपटातील कलाकारांचेही कौतुक होतेय. संजना सांघीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिच्यावरही कौतुकाचा वर्षाव होतोय. ही स्वस्तिका ख-या आयुष्यात कशी आहे?
स्वस्तिका ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. इतकी की, तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
दिल बेचारा या सिनेमात स्वस्तिकाने एक कर्करोगाने पीडित तरूण मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. कडक शिस्तीची, प्रसंगी हळवी आई तिने साकारली आहे.
दिल बेचारा या सिनेमाआधी स्वस्तिका ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यात तिने डॉली मेहताची भूमिका साकारली होती.
स्वस्तिका ख-या आयुष्यात प्रचंड क्रिएटीव्ह आहे. केसांसोबत आणि लूकसोबत नवेनवे प्रयोग करणे तिला आवडते.
बंगाली मालिका ‘देवदासी’मधून स्वस्तिकाने करिअरची सुरूवात केली होती.
2001 मध्ये ‘हेमांतर पाखी’ या बंगाली सिनेमात ती झळकली.
2008 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
वयाच्या 18 व्या वर्षीच स्वस्तिकाने लग्न केले होते. मात्र दोन वर्षांनंतर दोघांचाही घटस्फोट झाला.
स्वस्तिकाने पतीवर मारहाण तसेच गरोदरपणात घरात बंद करून ठेवल्याचा आरोप केला होता.
स्वस्तिका एका मुलीची आई आहे.