एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:27 PM2024-06-05T17:27:20+5:302024-06-05T17:57:30+5:30

चित्रपट आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी सेलिब्रिटींना रिंगणात उतरवले होते.

सध्या अशीच एक अभिनेत्री आणि अभिनेता चर्चेत आले आहेत. ज्या दोघांनीही आपल्या-आपल्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत, ते आहेत अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेते चिराग पासवान. हे दोघेही एका चित्रपटात झळकले होते.

मंडी या मतदारसंघातून कंगना विजयी झाली आहे. तर चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

चिराग पासवान हे राजकीय कुटुंबातून येतात. राजकारणात येण्यापुर्वी त्यांनी बॉलिवूडमध्ये नशिब आजमावलं होतं.

कंगना आणि चिराग यांनी 2011 मध्ये 'मिले ना मिले हम' या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

दोघांचा हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

चित्रपट फ्लॉप होताच, चिराग यांनी स्वतःला अभिनयापासून दूर केलं आणि वडिलांप्रमाणे राजकारणात एन्ट्री घेतली.

याआधी चिराग 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या जमुई मतदारसंघातून निवडून आले होते.

'मिले ना मिले हम' हा 2011 साली प्रदर्शित झालेला रोमँटिक ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये चिराग आणि कंगना रणौत व्यतिरिक्त नीरू बाजवा आणि सागरिका घाटगे देखील मुख्य भूमिकेत होत्या.