पहिलं लग्न मोडलं! २ मुलं सोडून १५ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत राहतो 'धुरंधर' अभिनेता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:52 IST2026-03-24T16:45:02+5:302026-03-24T16:52:18+5:30

पहिल्या पत्नीपासून २ मुले, आता १५ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत केलाय साखरपुडा, 'धुरंधर' फेम अभिनेत्याची लव्हलाईफ चर्चेत

हिंदी सिनेसृष्टीत तसेच सध्या प्रत्येक प्रेक्षकांच्या तोंडी 'धुरंधर २' या सिनेमाचं नाव आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय अॅक्शन चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण केली आहे.

या चित्रपटात रणवीर सिंगसह आणि आर.माधवनसह आणखी एक लोकप्रिय अभिनेता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तो म्हणजे अभिनेता अर्जुन रामपाल.

हिंदी चित्रपटसृष्टीत डॅशिंग पर्सनालिटीच्या अभिनेत्यांमध्ये अर्जुन रामपाल याचे नाव सध्या आघाडीवर आहे. 'आंखें', 'डॉन', 'रॉक ऑन! 'ओम शांती ओम', 'हाऊसफुल', 'राजनीति', 'Ra.One', 'डॅडी' या चित्रपटात नायक, खलनायक अशा विविध भूमिकांमुळे तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला.

आपल्या करिअरमध्ये चित्रपटांसह अर्जुन रामपाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकाच चर्चेत राहिला आहे.

अर्जुनने राजीव राय यांच्या 'प्यार इश्क और मोहब्बत' (२००१) या रोमॅटिक चित्रपटातून सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी आणि कीर्ती रेड्डी यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र अर्जुन रामपालच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

२००२ मध्ये अर्जुनला अमिताभ, अक्षय, सुष्मिता आणि परेश रावल यांच्यासोबत विपुल शाह यांच्या 'आंखें' या चित्रपटामध्ये आंधळ्या बँक दरोडेखोराची भूमिका मिळाली. या चित्रपटाच्या व्यावसायिक यशाने त्याला अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिध्दी मिळाली. त्याच वर्षी अर्जुनने रेखा, प्रीती झिंटा, महिमा चौधरी आणि जिमी शेरगिल यांच्यासमवेत कुंदन शाह यांच्या 'दिल है तुम्हारा' या चित्रपटातील त्याच्या दमदार भूमिकेने प्रेक्षकांना प्रभावित केले.

अर्जुन रामपालने १९९८ मध्ये सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले आणि या जोडप्याला माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. तथापि, रामपाल - जेसिया २०१८ मध्ये वेगळे झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

अर्जुन रामपाल सध्या दक्षिण आफ्रिकेतील मॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी गुपचुप साखरपुडा उरकला. या जोडप्याला एरिक नावाचा एक मुलगा आहे, त्याचा जन्म २०१९ मध्ये झाला आणि जुलै २०२३ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला.