'धुरंधर २'मध्ये दाऊद इब्राहिम साकारलेल्या अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:39 IST2026-03-20T12:28:31+5:302026-03-20T12:39:19+5:30

'धुरंधर २'मध्ये गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या दाऊदची भूमिका दानिश इकबालने साकारली आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत शूटिंगला सुरुवात होईपर्यंत दानिशला हे माहितच नव्हतं की त्याला बडे साहबची भूमिका साकारायची आहे.

Dhurandhar 2: 'धुरंधर'यच्या पहिल्या भागात बडे साहबचा उल्लेख झाला होता. दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड असलेला बडे साहब नक्की कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

अखेर 'धुरंधर २'मध्ये याचा उलगडा झाल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असून बडे साहब दुसरा तिसरा कोणी नसून दाऊद इब्राहिम आहे.

'धुरंधर २'मध्ये गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या दाऊदची भूमिका दानिश इकबालने साकारली आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत शूटिंगला सुरुवात होईपर्यंत दानिशला हे माहितच नव्हतं की त्याला बडे साहबची भूमिका साकारायची आहे.

दाऊद इब्राहिमची भूमिका साकारलेल्या दानिश इकबालने 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, "बडे साहबची भूमिका साकारायची आहे याबद्दल कधी बोललंच गेलं नव्हतं".

"शूटिंग सुरू व्हायच्या दोन महिने आधीपर्यंत मला माहीत नव्हतं की मला बडे साहब ही भूमिका साकारायची आहे. पण, मला अंदाज आला होता".

"आदित्य अनेक गोष्टी लपवून ठेवतो. मला दाऊद इब्राहिमची भूमिका साकारायची आहे, हे मला माहीत होतं. पण दाऊदच बडे साहब आहे, हे माहित नव्हतं".

"सगळे मला दाऊद भाई किंवा साहेब अशी हाक मारत होते. पण माझ्या भूमिकेबद्दल मला कोणीच काही सांगितलेलं नव्हतं".

"मी अनेक कलाकारांना पडद्यावर अशा भूमिका उत्कृष्टपणे साकारताना पाहिलं आहे. मी थिएटरमध्ये खूप काम केलं आहे. मात्र सिनेमात मी पहिल्यांदाच अशी भूमिका साकारली आहे".

दरम्यान, 'धुरंधर : द रिव्हेंज' सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या सिनेमाने पहिल्याच दिवशी १४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉलिवूडमधला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा ओपनर ठरला आहे.