ही आहे अभिनेता दीपक तिजोरीची लेक समारा, सौंदर्यात सारा-जान्हवीला देते टक्कर
By रूपाली मुधोळकर | Updated: November 13, 2020 08:00 IST2020-11-13T08:00:00+5:302020-11-13T08:00:02+5:30
पाहा, समाराचे ग्लॅमरस फोटो

अभिनेता दिपक तिजोरी आठवतो? दिपक तिजोरी आताश: कधीच चर्चेत दिसत नाही. पण सध्या त्याची लेक मात्र जाम चर्चेत आहे.

दीपक तिजोरीची लेक समारा तिजोरी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे.

समाराच्या पोस्ट, इन्स्टावरचे तिचे ग्लॅमरस फोटो लक्ष वेधून घेतात.

समारा सध्या 24 वर्षांची आहे. वडिलांप्रमाणेच समारा सुद्धा फिल्मी दुनियेत नशीब आजमावू इच्छिते.

समाराची ‘ग्रँड प्लान’ नामक शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये समाराने जबरदस्त हॅट सीन दिलेत. एका सीनमध्ये ती को-स्टारसोबत लिप लॉक करताना दिसली.

दीपक तिजोरी व त्याची पत्नी यांच्यातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आणि पत्नीने दीपकला घरातून हाकलून लावले, त्यावेळी समारा चर्चेत आली होती.

समाराचे बालपणी अपहरण झाले होते. त्यावेळी ती 13 वर्षांची होती. कशीबशी ती अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटली होती.

समाराने दिग्दर्शक रोहित धवनच्या ‘ढिशूम’ या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.

समाराला एक लहान भाऊ आहे, त्याचे नाव करण तिजोरी आहे.

आशिकी, सडक आणि खिलाडी अशा अनेक सुपरहिट चित्रपटात झळकलेला पण तरीही ‘फ्लॉप अॅक्टर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता दिपक तिजोरी सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. गेल्या काही वर्षांत तो इतका बदलला की, त्याला ओळखणेही कठीण होईल.

















