बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय केंद्रीय मंत्री निशंक पोखरियाल यांची लेक, दिसायला आहे हुबेहुब बार्बी डॉलसारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:45 IST2021-03-12T20:19:59+5:302021-03-12T20:45:57+5:30

आता राजकीय क्षेत्रातील आणखी एका मंत्र्याची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक तारिणी या युद्धपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Photo Instagram)

भारतीय सैन्यातील सहा साहसी महिला अधिकाऱ्यांच्या पराक्रमावर आधारित युद्धपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. (Photo Instagram)

टी सीरिजच्या या सिनेमाची निर्मिती करणार आहे. (Photo Instagram)

आरुषीचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी उत्तराखंडच्या कोटद्वार येथे झाला. (Photo Instagram)

2018 मध्ये आरुषीने यापूर्वी 'मेजर निराला' हा एक प्रादेशिक चित्रपट देखील तयार केला होता. हा चित्रपट वडील रमेश पोखरिया यांच्या कादंबरीवर आधारित आहे. (Photo Instagram)

आरुषीने केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशनमधून ग्रेज्युएशनमध्ये डिप्लोमा केला आहे. आरुषीला 2017 मध्ये 'प्राइड ऑफ उत्तराखंड' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. (Photo Instagram)

लहानपणापासूनच आरुषी नृत्याची आवड होती. बिर्जू महाराजांकडून तिने शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. (Photo Instagram)

आरुषी नृत्यदिग्दर्शनही करते. तिने 'गंगा अवतरण'वर आधारित नृत्य कोरिओग्राफ देखील केले आहे. (Photo Instagram)

सध्या ती देहरादूनच्या हिमालयन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची अध्यक्ष आहे. (Photo Instagram)

आरुषी निशंकने 24 जानेवारी 2015 रोजी अभिनव पंतशी लग्न केले. लग्नानंतरही ती गंगा निर्मूलन मोहिमेचा भाग राहिली आहे. (Photo Instagram)

आरुषी निशांकला 2020 मध्ये 'टॉप 20 ग्लोबल वुमन अ‍ॅवॉर्ड' देण्यात आला.(Photo Instagram)

Read in English