हे आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींचे ७ क्रेझी फॅन्स, काहींनी तर स्टार्सना घाबरवलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 15:45 IST2022-02-19T15:35:50+5:302022-02-19T15:45:02+5:30

Bollywood Celebrity Fans : बॉलिवूड कलाकारांच्या फॅन्सचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. या फॅन्सही त्यांच्या मनातील प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे.

Bollywood Celebrity Fans : आपल्या देशात माथेफिरू लोकांची कमी नाही. एक शोधायला गेलात तर हजारो मिळतील. विषय जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींचा येतो त्यांचे फॅनही आपल्या लाडक्या कलाकारांसाठी काहीही करायला तयार असतात. पण ही फॅनगिरी अनेकदा त्यांच्या अंगाशीही येते. बॉलिवूड कलाकारांच्या फॅन्सचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. या फॅन्सही त्यांच्या मनातील प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे.

सलमान खानला भेटण्यासाठी उपोषण - मौलिक बाबूभाई शेषंगिया नावाचा हा तरूण भाईजानला भेटण्यासाठी राजकोट 'प्रेम रतन धन पायो' च्या सेटवर पोहोचला होता. तो हट्ट धरून होता की, त्याला सलमान खानला भेटायचं आहे आणि त्याच्यासोबत फोटो काढायचा आहे. त्याला नकार मिळाला तेव्हा तो उपोषणाला बसला होता.

करिना कपूरला दिला डायमंड सेट - करिना कपूरचा एक फॅन तिला वर्षानुवर्षे पत्र लिहित होता. पण त्या पत्रांचं त्याला कधीच उत्तर मिळालं नाही. रिपोर्ट्सनुसार, त्या फॅनने करिना कपूरला एक डायमंड सेट गिफ्ट केला. ज्याची किंमत ४० लाख रूपये होती.

रजनीकांतला किडनी देण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न - रजनीकांत २०११ मध्ये किडनीच्या आजाराने सिंगापूरच्या एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये भरती होता. त्यावेळी सुंदरपुरम रजनीराजा अरोकियासामी आपली एक किडनी रजनीकांतला डोनेट करणार होता. त्याने त्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी विष खाल्लं होतं. नंतर त्याला वाचवण्यात आलं.

अमिताभ बच्चनचं मंदिर - अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे. पण अनेकांना माहीत नसेल की, त्यांचं एक मंदिरही आहे. कोलकातामध्ये त्यांच्या फॅन्सनी एक मंदिर बांधलं आहे. मंदिराच्या मुख्य भागी अमिताभ बच्चन यानी 'अग्निपथ' सिनेमात घातलेले शूज ठेवले आहेत. सोबतच सिनेमात ज्या सिंहासनावर ते बसले होते, तेही तिथे ठेवलं आहे. इथे लोक त्यांची पूजा करतात.

ऐश्वर्याच्या लग्नाच्या बातमी डिप्रेशनमध्ये गेला होता तरूण - श्रीलंकेतील निरोशन देवप्रिया हा ऐश्वर्या रायच्या लग्नाची बातमी ऐकून डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला वाटत होतं की, तो ऐश्वर्या सोबत रोमॅंटिक रिलेशनमध्ये आहे. इतकंच काय तर त्याने ऐश्वर्यावर केस करण्याचाही विचार केला होता. पण केली नाही.

अभिषेक बच्चनसाठी कापली हाताची नस - अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नावेळी एक मॉडल जान्हवी कपूरने आपल्या हाताची नस कापली होती. तिने दावा केला होता की, अभिषेक आणि तिचं आधीच लग्न झालं आहे. गोंधळानंतर पोलिसांनी मॉडलला अटक केली होती.

शाहरूख खानला डेडिकेट केलं आपलं घर - लखनौमध्ये शाहरूख खानचा एक मोठा फॅन आहे. त्याने त्याचं घर शाहरूखला समर्पित केलं आहे. या घराला त्याने एसआरके पॅलेस ठेवलं. त्याने पूर्ण घरात शाहरूखचे फोटो लावले आहेत. इतकंच नाही तर त्याने त्याचं विशाल सिंह हे नाव बदलून विशारूख सिंह केलं आहे.