आईच्या निधनानंतर बहिणीचा केला सांभाळ, आज आहे आघाडीचा अभिनेता; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 10:40 IST2023-03-10T10:25:40+5:302023-03-10T10:40:45+5:30
आईचं निधन, बहिणीचा सांभाळ आणि सावत्र बहिणींसोबतही खास नातं. या अभिनेत्याला ओळखलंत का?

सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. त्यावरुन त्यांना ओळखणंही कठीण होतं. सध्या असाच एक भावाबहिणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
फोटोतील मुलगा आता बॉलिवूडमधला मोठा स्टार आहे तर मुलगी लाईमलाईटपासून दूर आहे. या भावाबहिणीच्या आईचं लहानपणीच निधन झालं. तर वडिलांनी आधीच दुसरं लग्न केलं होतं. यानंतर दोघांनीच एकमेकांनी सांभाळलं.
हे भाऊ बहिण कोण आहेत हे तुम्हाला कळलंच असेल. तर हे भावंडं दिग्दर्शक निर्माते बोनी कपूर यांची मुलं आहेत. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही कपूर भावंडं नेहमीच चर्चेत असतात.
अर्जुन कपूर हा बहिण अंशुलापेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे. त्यांची आई मोना कपूर आणि वडील बोनी कपूर यांचा १९९६ सालीच घटस्फोट झाला होता. काही वर्षांनी मोना कपूर यांना कॅन्सर झाला. २०१२ साली त्यांचं निधन झालं.
आईच्या निधनानंतर दोन्ही भावंडं खचून गेली होती. मात्र दोघांनी एकमेकांना सांभाळलं. वडील बोनी कपूर यांनी १९९६ सालीच श्रीदेवी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र श्रीदेवी यांच्यापासून अर्जुन आणि अंशुला कायमच दूर राहिले. या भावंडांचं वडील बोनी कपूर यांच्यासोबतही फार चांगलं नव्हतं.
2018 मध्ये श्रीदेवी यांच्या निधनानंतर दोन्ही भावंडं पुन्हा वडील बोनी कपूर यांच्या जवळ आले. दोघांनी वडिलांना त्यावेळी साथ दिली. बऱ्याच वर्षांनंतर वडील आणि मुलांमध्ये चांगला संवाद झाला होता.
इतकंच नाही तर सावत्र बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्याशीही जवळीक वाढली. दोन्ही लहान बहिणींना अर्जुन आणि अंशुलाने या कठीण प्रसंगी साथ दिली.
अर्जुनने बहिण अंशुलासाठी एक छान पोस्ट लिहिली होती. त्याने लिहिले, ' माझ्या जीवनातील साथी. आपण नेहमीच सोबत आहोत. तुला सगळं चांगलंच मिळो.' चाहत्यांनी या पोस्टवर प्रेम व्यक्त केलंय.
बोनी कपूरच्या चारही मुलांमध्ये आता छान बॉंडिंग आहे हे त्यांच्या फोटोंमधून दिसते. पार्ट्या असो किंवा एखादा सण त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर दोघंही सध्याचे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. तर खुशी कपूर मॉडेलिंगमध्ये आहे. अंशुला मात्र फिल्मइंडस्ट्रीपासून दूर आहे.