Cannes 2018 : कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका-कंगनाच्या पाहा मनमोहक अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-12T16:10:38+5:302018-06-27T19:50:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि दीपिका पादुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दीपिका लोरियाल पॅरिससाठी तर कंगना एक लिकर ब्रॅण्डसाठी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. यादरम्यान दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या लूकमध्ये कुठलीच कमी ठेवली नसल्याचे दिसून आले. कंगनाचा हा पहिलाच कान्स होता, तर दीपिकाने यापूर्वी कान्समध्ये आपल्या सौंदर्याचे जलवे दाखविले होते. कान्सच्या पहिल्या दिवशी दोन्ही अभिनेत्री जवळपास एकाच स्टाइलच्या गाउनमध्ये बघावयास मिळाल्या. तर दुसºया दिवशी दीपिकाने पिंक गाउनमध्ये आपला जलवा दाखविला तर कंगना कॅट लूकमध्ये रेड कार्पेटवर आपल्या मनमोहक अदा दाखविताना दिसली. दोन्ही अभिनेत्रींचे रूप घायाळ करणारे ठरले.