'ब्रेस्ट वाढव, सर्जरी कर'; मराठमोळ्या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये मिळाला होता सल्ला, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:36 PM2023-04-13T12:36:56+5:302023-04-13T12:40:53+5:30

मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आलेल्या बॉडी शेमिंगबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे.

चमचमत्या सिनेइंडस्ट्रीची काळी बाजूदेखील कलाकारांनी जगासमोर आणली आहे. बऱ्याच कलाकारांना कास्टिंग काऊच आणि बॉडी शेमिंगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. असाच बॉडी शेमिंगबाबतचा एक खुलासा एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिकाने हिंदी सिनेइंडस्ट्रीत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकताच राधिकाने जो खुलासा केला आहे, जो वाचून चाहते हैराण झाले आहेत.

राधिका आपटेनं सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ती इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. तिला नाकाची सर्जरी करायला आणि स्तनाचा आकार वाढवण्याचा सल्ला देण्यात आला होता. वाढलेल्या वजनामुळे त्याला चित्रपटही गमवावा लागला होता.

३७ वर्षीय राधिका आपटेनं खेड्यातील मुलीपासून शहरी पात्रांपर्यंत आणि कॉमेडीपर्यंत हात आजमावला आहे. तिने फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिला यशस्वी व्हायचे असेल तर तिचे स्वरूप बदलावे लागेल असे तिला कसे सांगण्यात आले होते.

राधिका आपटे म्हणाली की, 'तीन-चार किलो वजनामुळे मी एक चित्रपट गमावला. अर्थात, जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा ते म्हणतात, 'तुम्ही नाक का नीट करत नाही? तुम्ही तुमचे ब्रेस्ट का मोठे करत नाही? सुरुवातीला हे घडले. मधेच काही लोक तुमच्या शरीरावर हक्क असल्याचे भाष्य करतात.

ती पुढे म्हणाली की, आता गेल्या काही वर्षात झालेल्या जनजागृतीमुळे आपण त्याबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतो. आपण असे म्हणू शकतो की, 'तुम्ही मला पुन्हा असे म्हटले तर मी खात्री करून घेईन की तुम्ही या प्रकल्पातून बाहेर पडाल'.

अभिनेत्रीने असेही सांगितले की जरी ती वेगवेगळी पात्रे साकारत असली तरीही तिला टाइपकास्ट होण्याची भीती वाटते. ती म्हणते, ' धारणा फार विचित्र असतात. मी बदलापूर चित्रपटापूर्वी लोकांना वाटायचे की मी जास्त काळ खेड्यातील मुलगी असू शकते.

बदलापूर नंतर लोकांना वाटले की मी फक्त सेक्स कॉमेडी करू शकते, मी कपडे उतरवू शकते. म्हणून, मी थांबले. मी त्याला कधीच हो म्हटलं नाही, असे ती सांगते.

राधिका लवकरच Zee5 च्या मिसेस अंडरकव्हरमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती एका गृहिणीची भूमिका साकारत आहे जी एक गुप्त गुप्तहेर देखील आहे.

या कॉमेडी-थ्रिलरचे दिग्दर्शन अनुश्री मेहता यांनी केले आहे. यात सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.