तुमचा विश्वास बसणार नाहीत, पण चित्रपटातील हे सीन्स रिअल नाहीत...! पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 08:00 IST2022-04-08T08:00:00+5:302022-04-08T08:00:06+5:30

Bollywood : डोळ्यांना दिसतं ते सगळं सत्य नसतं. बॉलिवूडच्या चित्रपटात VFX तंत्राचा वापर होतो. याचमुळे शूटच्या वेळी स्थिर असलेली गाडी पडद्यावर चालताना दिसते. स्टुडिओत शूट झालेला सीन्स फॉरेनमध्ये शूट केल्यासारखं भासतं...

अनेकदा चित्रपटातील सीन्स बघून आपण टाळ्या वाजवतो, शिट्टी मारतो. पण डोळ्यांना दिसतं ते सगळं सत्य नसतं. बॉलिवूडच्या चित्रपटात व्हिएफएक्स तंत्राचा वापर होतो. याचमुळे शूटच्या वेळी स्थिर असलेली गाडी पडद्यावर चालताना दिसते. स्टुडिओत शूट झालेला सीन्स फॉरेनमध्ये शूट केल्यासारखं भासतं.

बाहुबली आणि बाहुबली 2 या भव्यदिव्य सिनेमात मोठ्या प्रमाणात VFX तंत्राचा वापर झाला. या तंत्राच्या मदतीने सीन किती भव्यदिव्य दाखवला जाऊ शकतो, याचं हे एक छोटसं उदाहरण आहे. बाहुबली सीरिज अशा असंख्य उदाहरणांनी बनलेली आहे.

वरुण धवनचा जुडवा 2 मधील हा अ‍ॅक्शन सीन सुद्धा असाच VFXच्या मदतीने चित्रीत झाला होता.

तुम्हाला आठवत असेल तर पद्मावत वादांच्या भोवऱ्यात सापडला होता. काही संस्कृती रक्षकांनी या चित्रपटाला खूप विरोध केला गेला होता. चित्रपटाच्या ‘घूमर’ या गाण्यातील दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता. यानंतरला दीपिकाचं पोट VFX तंत्राच्या मदतीने झाकलं गेलं होतं.

शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणचा गाजलेला चेन्नई एक्स्प्रेस हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. हे दृश्य लगेच तुमच्या डोळ्यासमोर येईल.

कॉकटेलचा स्टुडिओमध्ये शूट झालेला हा सीनही VFXचीच कमाल आहे. या सीनमध्ये दीपिका पादुकोण एका उंच इमारतीच्या टॉप फ्लोरच्या बाल्कनीत बसलेली दाखवली आहे. पण खरं काय होतं, तुम्हीच बघा.

क्रिश हा भारताला पहिला वाहिला सुपरहिरोचा चित्रपट. या चित्रपटात अनेक सीन्समध्ये VFXचा वापर केला गेला आहे.

भाग मिल्खा भाग या सिनेमातील रेस, ट्रेनचे सीन्स VFXच्या मदतीने तयार करण्यात आले होते. यात मिल्खा सिंग यांच्या सर्व जुन्या रेस व स्पर्धांना पुनरूज्जीवीत करण्यात आलं होतं.

सलमानच्या किक या चित्रपटाील अनेक सीन्ससाठीही VFXची मदत घेतली गेली होती.