संजय लीला भन्साळींच्या आईने आवाज ऐकला अन् तिचं नशीब चमकलं! बंगालच्या 'या' लेकीची जगभरात क्रेझ, ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:55 IST2026-03-12T15:44:38+5:302026-03-12T15:55:57+5:30
Shreya Ghoshal: ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,७ फिल्मफेअर मिळवणारी गायिका,बंगालमधील या मुलीच्या आवाजाची जगाला भुरळ

पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सात फिल्मफेअर पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, चार केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, दोन तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, दोन बीएफजेए पुरस्कार, २० मिर्ची संगीत पुरस्कार, १० आयफा पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरणारी पार्श्वगायिका श्रेया घोषाल ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी गायिकांपैकी एक आहे.

फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालेल्या घोषाल कुटुंबात श्रेया घोषाल हिचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. तिचे वडील विश्वजीत घोषाल मुखोपाध्याय हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

अवघी ४ वर्षांची असल्यापासूनच श्रेया तिच्या आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. या गाण्यांचा सराव करताना बाल श्रेया आईचं गाणं ऐकून तेच गाणं आपल्या बोबड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करायची. इथूनच श्रेयाच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

गायिकेनं तिचं शास्त्रीय संगीताचं प्राथमिक प्रशिक्षण तिच्या आईकडूनच घेतलं. त्यानंतर मग श्रेया कोटा येथील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले. नंतर, मुंबईला गेल्यानंतर, पद्मश्री स्वर्गीय कल्याणजी भाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिने १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.

गायिकेनं तिचं शास्त्रीय संगीताचं प्राथमिक प्रशिक्षण तिच्या आईकडूनच घेतलं. त्यानंतर मग श्रेया कोटा येथील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले. नंतर, मुंबईला गेल्यानंतर, पद्मश्री स्वर्गीय कल्याणजी भाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिने १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.

याचदरम्यान, संजय लीला भन्साळी देवदास सिनेमा बनवत होते. इस्माईल दरबार यांनी गाण्यांच्या गायिकाही नक्की केल्या होत्या. ऐश्वर्याच्या गाण्यांसाठी लताबाईंचं नाव नक्की झालं होतं. बैरी पिया हे गाणं, त्या गाण्यातले चढ उतार फक्त लतादिदीच म्हणू शकतात आणि ऐश्वर्याची गाणी ही देखील टिपीकल दिदींचीच गाणी असल्याने लताबाईंची निवड नक्की होती.

१९९९ साली श्रेया घोषाल सारेगम या स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. असंच एकदा सारेगमपा बघत असताना श्रेयाचा आवाज संजय भन्साळी यांच्या आईने ऐकला आणि तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून तिचा आवाज ऐकायला सांगितला आणि इथेच संजय लीला भन्साळी यांना पारोचा आवाज मिळाला. तिच्या आवाजातला निरागसपणा त्यांना फार आवडला आणि या गाण्यासाठी श्रेयाचा निवड झाली.

देवदास नंतर श्रेया बॉलीवूड आणि इतर चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायिका बनली. तिने ए.आर. रहमान, विशाल-शेखर, शंकर-एहसान-लॉय, प्रीतम, अमित त्रिवेदी सारख्या अनेक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलें आहे. आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.

















