Bollywood : यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:07 PM2023-01-20T13:07:20+5:302023-01-20T13:16:06+5:30

कोरोना आला आणि बॉलिवूडचा वाईट काळ सुरु झाला. एकामागोमाग एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होऊ लागले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमांनी बाजी मारली

२०२३ मध्ये तरी बॉलिवूडची बुडतं जहाज वर येईल का हे आगामी चित्रपटांवर अवलंबून आहे.रोहित शेट्टीचा नुकताच रिलीज झालेला 'सर्कस' सिनेमा चांगलाच आपटला. हा सिनेमा तर हिट होणारच अशी खात्रीच रोहितला होती. यंदा 8 बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. या चित्रपटांकडून बॉलिवूडला फार आशा आहेत.

यशराज फिल्म्सचा आगामी 'पठाण'सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. रिलीजआधीच सिनेमाशी निगडीत वादविवादाने चित्रपटाची लोकप्रियता वाढली आहे. तर शाहरुख खानला ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर बघण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. यात शाहरुखचा अॅक्शन अवतार बघायला मिळणार आहे.

रोहित धवन दिग्दर्शित कार्तिक आर्यनचा 'शहजादा' १० फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे.चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून यात कार्तिकचा अॅक्शन अवतार दिसत आहे. शहजादा दाक्षिणात्य चित्रपट अला वैकुंथपुरमलू सिनेमाचा रिमेक आहे. यामध्ये अभिनेत्री क्रिती सेननचीही भूमिका आहे.

यावर्षी अजय देवगण आणि तब्बूचा जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या जोडीची जादू काही औरच असते. यांचा 'भोला' हा सिनेमा ३० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. भोला चा फर्स्ट लुक आणि टीझर चाहत्यांना फारच आवडला आहे. त्यामुळे आता सिनेमाची उत्सुकता ताणली आहे.

करण जोहर मोठया ब्रेकनंतर दिग्दर्शन करणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ एप्रिल रोजी भेटीस येत आहे. यामध्ये धर्मेंद्र आणि जया बच्चन यांचीही भूमिका असणार आहे.

किंग खानच्या चाहत्यांसाठी गुडन्युज कारण शाहरुखचा पठाण शिवाय आणखी एक सिनेमा यंदा प्रदर्शित होणार आहे. जवान या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख जादू दाखवणार आहे. एटली कुमार दिग्दर्शित 'जवान ' २ जून रोजी जवान रिलीज होणार आहे.

यावर्षी आणखी एका चित्रपटाची उत्सुकता आहे तो म्हणजे ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'. यामध्ये सैफ अली खान आणि क्रिती सेननही मुख्य भुमिकेत आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आकर्षण ठरत आहेत.

ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत भाईजानचा सिनेमा नसेल असं होणं शक्यच नाही. सलमान खानचा 'टायगर ३' यावर्षी रिलीज होण्यास सज्ज आहे. सलमानच्या टायगर सिरीजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोच. १० नोव्हेंबर रोजी टायगर चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

याशिवाय बॉलिवूडला आणखी एक फ्रेश जोडी मिळणार आहे. लव्ह रंजन दिग्दर्शित 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र येत आहे. ८ मार्च रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

२०२३ मध्ये दोन फिट अभिनेत्यांची जोडी बघायला मिळणार आहे. ती म्हणजे खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. त्यांचा 'बडे मिया छोटे मिया' रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.