एकेकाळी फोटोशूटसाठीही नव्हते पैसे; तोच आज आहे 170 कोटींचा मालक, तुम्ही ओळखलं का त्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:11 AM2024-01-23T11:11:35+5:302024-01-23T11:16:31+5:30

Bollywood actor:हा अभिनेता लवकरच फायटर या सिनेमात झळकणार आहे.

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मोठा स्ट्रगल करुन इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात असेही काही कलाकार आहेत जे स्टार किड्स असूनही त्यांना संघर्ष काही चुकला नाही.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन याची चर्चा रंगली आहे. स्टार किड असूनही हृतिकला बराच संघर्ष करावा लागला आहे.

आज हृतिकचं नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत येतं. परंतु, सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे साधे फोटोशूट करण्यापूरतेही पैसे नसायचे. विशेष म्हणजे स्टार किड असूनही त्याने कधी वडिलांची मदत घेतली नाही.

अलिकडेच प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने हृतिकविषयी काही खुलासे केले.

पहिल्या फोटोशूटच्यावेळी हृतिकने त्याच्या मित्राकडून जॅकेट मागून घातलं होतं, असं डब्बू रतनानीने सांगितलं.

त्यावेळी हृतिककडे फोटोशूटच्या पेमेंटचे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने २-३ दिवसात पैसे देतो असं सांगितलं होतं.आणि, मग फोटोशूट केलं होतं. विशेष म्हणजे ज्यावेळी हृतिक फोटोशूट करायला आला त्यावेळी तो अभिनेता राकेश रोशनचा लेक आहे हे डब्बू रतनानीला माहित नव्हतं.

आज हृतिक बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असून तो एका सिनेमासाठी ४०-५० कोटी रुपये घेतो. नुकतंच त्याने फायटर या सिनेमासाठी ५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

हृतिकचं आजचं नेटवर्थ २५ मिलिअन डॉलर असल्याचं सांगण्यात येतं. भारतीय चलनानुसार, ही रक्कम १७० कोटी रुपये इतकी आहे.