मोकळ्या केसांत माझ्या, तू जिवाला गुंतवावे... नोरा फतेहीच्या साडीतल्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:05 PM2023-09-09T17:05:45+5:302023-09-09T17:33:34+5:30

मलमली तारूण्य माझे... नोरा फतेहीच्या साडीतल्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ

Nora Fatehi Saree Look, Indian Traditional Photos : निखळ सौंदर्य आणि अप्रतिम फिटनेस असा दुहेरी संगम म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अँड बिनधास्त अभिनेत्री नोरा फतेही.

सुंदरतेची राणी म्हणून नोरा फतेही ओळखली जाते. ती जेव्हाही कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा तिच्या फोटोंची नेहमी चर्चा रंगते.

नोरा फतेही सहसा वेस्टर्न आऊटफिट मध्ये दिसते, पण तिचा साडीतला लूक देखील तुम्हाला तितकाच दिलखेचक वाटू शकतो यात वाद नाही.

नोराने नुकतेच तिच्या नव्या साडी लूकने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा नव्याने मोहिनी घातली आहे. ताज्या फोटोंमध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.

नृत्य आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेहीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

'दिलबर गर्ल'पासून ते 'देसी गर्ल'पर्यंतच्या नोराच्या या लूकची इंटरनेटवर खूप प्रशंसा केली जात आहे. साडीतल्या तिच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.

फर्स्ट लूकमध्ये नोरा पांढऱ्या-लाल कॉम्बिनेशनची साडी नेसून पोज करताना दिसत आहे. सिल्क साडीसह रेशमी लाल हॉट कट-स्लीव्ह ब्लाउज घातला आहे.

या साडीसोबतच नोराने कानात छानसे झुमके घातलेत. गळ्यात एक अतिशय रेखीव असा हार आणि हातात बांगड्या घातल्या आहेत.

दुसऱ्या लूकमध्ये तर नोरा अधिकच उठून दिसत आहे.

दुसऱ्या लूकमध्ये नोरा फतेही हिरव्या रंगाची सिल्क साडी परिधान करताना दिसत आहे. त्यासह तिने डीप नेक मखमली ब्लाउज घातलाय.

नोराने कानात झुमके आणि हातात ब्रेसलेट घालून हा लूक पूर्ण केला आहे. नोराच्या नवीन पारंपारिक लूकवर नेटिझन्स पुरते फिदा असून भरपूक चांगल्या कमेंट करत आहेत.

सर्व फोटो- नोरा फतेही इन्स्टाग्राम (Nora Fatehi Instagram)