या प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या ५ दिवसात लूक बदलला; बदल पाहून चाहत्यांना धक्का, फोटो व्हायरल

By देवेंद्र जाधव | Updated: July 16, 2025 12:43 IST2025-07-16T12:30:06+5:302025-07-16T12:43:26+5:30

प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा लूक बदलला आहे. अभिनेत्रीचा फक्त ५ दिवसात तिच्या लूकमध्ये जो बदल केलाय तो पाहून चाहते थक्क झालेत

फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलं का? ४६ वर्षीय अभिनेत्रीने केलेला हा बोल्ड लूक सध्या चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे विद्या बालन. विद्या ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. द डर्टी पिक्चर, तुम्हारी सुलु अशा आशयघन सिनेमातून ती चर्चेत राहिली आहे.

विद्या बालनने एका मॅगझिनसाठी हे खास फोटोशूट केलं आहे. विद्याचा हा लूक चांगलाच चर्चेत राहिला आहे. विद्याने लाल गाऊन, केसांना खास रंग आणि कमीतकमी दागिने परिधान केले आहेत.

विद्याचा हा लूक तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. ४६ वर्षीय विद्याच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं आहे.

सिनेमा इंडस्ट्रीला जे कलाकार पुढे घेऊन जात आहेत, त्यांच्यासाठी या मॅगझीनमध्ये खास स्टोरी येतात. यंदा हा मान विद्या बालनला मिळाला आहे.

विद्या बालनने हा लूक करुन नवोदित अभिनेत्रींना नकळत एक प्रेरणा दिली आहे. विद्या बालनने हा खास लूकसाठी घेतलेली विशेष शारीरिक मेहनत सर्वांना थक्क करुन सोडत आहे

विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, नुकतीच ती झी मराठीच्या कमळी मालिकेसाठी खास प्रोमो शूट करताना दिसली. विद्याच्या नवीन सिनेमाबद्दल अद्याप कोणतीही अपडेट नाही