Pregnancy Glow! ४० व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, फोटोशूटमध्ये दिसतेय खूप सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:13 IST2026-01-31T15:53:26+5:302026-01-31T16:13:31+5:30
आई होणं हे कोणत्याही स्त्रीसाठी मोठी गोष्ट असते. अशातच मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे

आई होणं हे कोणत्याही स्त्रीसाठी मोठी गोष्ट असते. अशातच मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे.

ही अभिनेत्री तुम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनम कपूर. सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार असून तिने केलेलं खास फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.

काळ्या आणि निळसर रंगाचा गाऊन परिधान करुन सोनम कपूर नुकतीच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी सोनमने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आलंय.

दुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या सोनमच्या चेहऱ्यावर Pregnancy Glow स्पष्ट झळकत असून ती सुंदर दिसतेय, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

सोनम कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. नीरजा, खूबसुरत, रांझणा हे सोनमचे सिनेमे खूप गाजले.

सोनम कपूर सध्या काम करत नसली तरीही तिचे सिनेमे आवडीने पाहिले जातात. सोनमला पहिला मुलगा असून त्याचं नाव वायू असं आहे.

सोनम कपूर ही अनिल कपूर यांची लेक आहे. सोनम सिनेसृष्टीपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

















