डोळ्यावर गॉगल अन् हातात बॅग, दुसऱ्यांदा आई होणाऱ्या सोनम कपूरचा स्वॅग; मॅटर्निटी फोटोशूटची एकच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:44 IST2026-02-02T13:39:18+5:302026-02-02T13:44:10+5:30

लग्नानंतर ८ वर्षांनी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री, सोनम कपूरच्या मॅटर्निटी फोटोशूटची रंगली चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली.

सोनम वयाच्या ४०व्या वर्षी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्रीने नुकत्याच केलेल्या मॅटर्निटी फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगली आहे.

सोनमने स्कर्ट आणि शर्ट असा लूक करत सुंदर मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिने बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे.

डोळ्यावर गॉगल लावत अभिनेत्रीने फोटोशूटसाठी छान पोझही दिल्या आहेत.

सोनमचं हे मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे. यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

सोनम कपूर ही अनिल कपूरची लेक आहे. सोनम कपूरने सावरिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली. पण तिला फार यश मिळालं नाही.

सोनमने २०१८ साली आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे. आता दुसऱ्यांदा ती आई होणार आहे.