कोट्यवधींची मालकीण आहे रकुल प्रीत सिंह; अलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 06:10 PM2024-01-02T18:10:02+5:302024-01-02T18:29:11+5:30

रकुल प्रीत सिंहने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांची लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.

रकुल आणि जॅकी २२ फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे. पण, दोघांनी या लग्नाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

रकुल प्रीत सिंगने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. शिवाय, रकुल ही कोटींची मालक आहे.

लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, रकुल प्रीत ही 49 कोटींची मालक आहे. यात तिच्या वांद्रे, मुंबईतील घर, हैदराबाद आणि दिल्लीतील मालमत्तांचा समावेश आहे.

रकुल प्रीत सिंहचे हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये 3BHK घर आहे, ज्याची किंमत 3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तसेच इतर ठिकाणीही तिच्या काही मालमत्ता आहेत.

या अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ जीएलई (1 कोटी), रेंज रोव्हर स्पोर्ट्स (70 लाख), BMW 520d ( 75 लाख) या गाड्यांचे कलेक्शन आहे. याशिवाय तिच्याकडे 35 लाख रुपयांची Audi Q3 आणि Mercedes-Maybach GLS600 आहे, ज्याची किंमत 2.96 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

रकुल प्रीतने 2014 मध्ये 'यारियां' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती 'सरदार का नातू', 'शिमला मिर्ची', 'आय लव्ह यू', 'रनवे 34', 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'दे दे प्यार दे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

याआधी रकुल प्रीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

ती चित्रपटांशिवाय जाहिराती आणि स्टेज शोद्वारे मोठी कमाई करते.

रकुल प्रीत सिंह कमल हासनसोबत इंडियन २ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकरदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.