मिस इंडियाचा किताब जिंकणारी अभिनेत्री! प्रेमासाठी करिअरवर सोडलं पाणी, आता सिनेमांपासून दूर जगतेय 'असं' आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:35 IST2026-03-15T15:19:34+5:302026-03-15T15:35:04+5:30

सलमानच्या सिनेमातून चमकली! बहीण अन् पतीही सुपरस्टार तरीही बहरली नाही अभिनेत्रीची कारकीर्द, आता इंडस्ट्रीपासून दूर जगतेय असं आयुष्य

१९९३ मध्ये मिस इंडिया किताब पटकावणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर.म्रता चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी मिस इंडिया झाल्यानंतरच तिचे नाव प्रसिध्दीच्या शिखरावर होते.मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात करुन प्रसिद्धी मिळत असतानाच तिने इंडस्ट्रीला रामराम केला.

२२ जानेवारी १९७१ ला नम्रताचा महाराष्ट्रात जन्म झाला. अभिनयाचा वारसा तिला आजी मीनाक्षी शिरोडकर यांच्यापासूनच मिळाला होता. मीनाक्षी शिरोडकर ह्या जुन्या जमान्यातील प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक होत्या. बहीण शिल्पा शिरोडकरनंतर नम्रताने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

त्यापूर्वी तिने १९७७ मध्ये आलेल्या शिर्डी के साईबाबा चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर नम्रताने शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मीठीबाई विद्यालयात तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नम्रताने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला.

१९९८ मध्ये सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ यात एक छोटी भूमिका मिळाली. यानंतर नम्रताच्या करिअरचा आलेख चढता गेला. मग 'पुकार','हेराफेरी', 'अस्तित्व', 'कच्चेधागे', 'तेरा मेरा साथ रहे', 'एलओसी कारगिल' या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची चमक दाखवली. दरम्यान, 'वास्तव' हा नम्रताच्या कारकिर्दीतील एक यशस्वी चित्रपट ठरला.'वास्तव'साठी तिला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा आइफा पुरस्कार मिळाला होता.

मात्र, त्याच त्याच धाटणीच्या भूमिका मिळत असल्याने, तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपली पाऊले वळवली आणि साऊथ इंडियन इंडस्ट्रीत काम करणं सुरु केलं.

२००० मध्ये तेलगू चित्रपट वानसीच्या चित्रीकरणादरम्यान दक्षिण सुपरस्टार महेश बाबू बरोबर ओळख झाली व नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर १० फेब्रुवारी २००५ ला मुंबईतील जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले. विशेष म्हणजे या दोघांच्या वयात तीन वर्षांचे अंतर आहे.

नम्रता महेश बाबूपेक्षा वयाने मोठी आहे. महेशच्या कुटुंबियांनी लग्नाला विरोध केला होता परंतु दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याने त्यांनी लग्न केले. त्यांना दोन गौतम आणि सितारा अशी दोन अपत्ये आहेत.

लग्नानंतर तिने अभिनय सोडून दिला. नम्रता आता सोशल मीडियावर अॅक्टिव असते आणि कौटुंबिक जीवनाची झलक दाखवत असते. तेव्हापासून आतापर्यंत तिचा लूकही खूप बदलला आहे.