२६ व्या वर्षी डेब्यू, सलमानने लॉन्च करुनही चालली नाही जादू! चित्रपट प्लॉप झाला अन् अभिनेत्रीने नावच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:26 IST2025-11-27T17:17:56+5:302025-11-27T17:26:05+5:30

२६ व्या वर्षी डेब्यू, सलमानने लॉन्च करुनही चालली नाही जादू, चित्रपट प्लॉप झाला अन् अभिनेत्रीने नावच बदललं

काही कलाकारांना त्यांच्या पहिल्याचं सिनेमातून इतकी प्रसिद्धी मिळते की त्यांना मागे वळून पाहावं लागतं नाही. मात्र, करिअरच्या सुरुवातीलाच एखादा चित्रपट फ्लॉप झाला तर त्याचा फार मोठा परिणाम होतो. काम मिळवण्यासाठी अनेकदा कलाकाराला स्वत सिद्ध करून दाखवावं लागतं.

अशीच एक अभिनेत्री जिने ७ वर्षांपूर्वी एका चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. पण, तिच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही. त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावली.

ही अभिनेत्री म्हणजे वारीना हुसैन. २०१८ मध्ये आलेल्या लव्हयात्री या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत डेब्यू केला. या सिनेमात सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा देखील मुख्य भूमिकेत होता.

गोरा रंग आणि घाऱ्या डोळे असं सौंदर्य लाभलेली वारीना अनेकांच्या पसंतीस उतरली.

पण, यानंतर वारीना लाईमलाईटपासून दूर होती.

अलिकडेच ही अभिनेत्री तिच्या सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चेत आली होती.

आता ती कपिल शर्माच्या दे दे प्यार दे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.