बॉलिवूडची पहिली खलनायिका! प्राण यांच्यासोबत जोडलेलं नाव, पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:06 IST2026-02-04T15:40:58+5:302026-02-04T16:06:48+5:30

नर्गीस, मधुबाला यांच्या स्टारडमवर पडलेली भारी! चित्रपटांमध्ये खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा शेवट चटका लावणारा

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली खलनायिका होण्याचा मान मिळविणार्‍या अभिनेत्री म्हणजे कुलदीप कौर. त्यांना चित्रपट सृष्टीतील पहिली 'बॅड गर्ल' म्हटलं जायचं.

कुलदीप कौर यांचा जन्म १९२७ ला अखंड भारतातील लाहोर (आता पाकिस्तानात) अमृतसर जिल्ह्यातील अटारी येथील जमीनदार असलेल्या समृध्द जाट परिवारात झाला.

वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांचा विवाह महाराजा रणजीतसिंह यांच्या सैन्याचे जनरल कमांडर शामसिंह अटारीवाला यांचा नातू मोहिंदरसिंह सिद्धू यांच्याशी झाला.

कुलदीप यांचे स्वप्न होते अभिनेत्री होण्याचे त्यावेळेस लाहोरच्या चित्रपटसृष्टीत प्राण प्रसिध्द होते. त्यांना लाहोर येथील पंजाबी चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. पण त्याचदरम्यान भारताची फाळणी झाली. त्यामुळे त्यांना प्राण यांच्यासोबत भारतात आल्या.

फाळणीनंतर स्वतंत्र भारतात निर्माण झालेला पहिला पंजाबी चित्रपट असलेल्या 'चमन "(१९४८) या पंजाबी चित्रपटातून कुलदीप कौर यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं

त्याकाळात नर्गीस, नसीम बानो, निम्मी, मधुबाला यांसारख्या आघाडीच्या नायिका होत्या. या अभिनेत्रींमध्ये त्यांनी स्वत: च एक वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनेत्री कुलदीप कौर यांनी १९४८ मध्ये आलेल्या बॉम्बे टॉकीजच्या जिद्दी आणि गृहस्थी या चित्रपटात पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका वठवली. यानंतर त्यांच्या खलनायिकेच्या कारकि‍र्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

त्यानंतर कुलदीप यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'आधी रात', 'कनीज', 'समाधी' आणि 'बैजू बावरा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.कनीज या चित्रपटापासून त्यांनी साकारलेली खलनायिका अनेकांनी भावली. या भूमिकेने त्यांना अफाट यश मिळवून दिलं.

१९६० मध्ये आलेला 'बड़े घर की बहू' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. १९६० मध्ये शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जातांना कुलदीप यांच्या पायाला काटा टोचला पण स्वभावाने बिनधास्त असलेल्या कुलदीप यांनी त्याची पर्वा केली नाही. काट्याची जखम चिघळली आणि धर्नुवाताने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.