'आँखों में कुछ महके हुए से राज...' क्रिती सनॉनचा ब्रायडल लूक एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 04:41 PM2024-04-18T16:41:20+5:302024-04-18T16:51:19+5:30

क्रिती सनॉन ही इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'हिरोपंती' या सिनेमातून क्रिती सनॉनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

क्रिती तिच्या फॅशन, लाईफस्टाईल आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

हिंदी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना कायम मोहित केलं आहे.

नुकताच वाराणसी शहरातील नमो घाटाजवळ फॅशन शो पार पडला. याचे आयोजन मनीष मल्होत्रानं केलं होतं.

यावेळी क्रिती सनॉन रॉयल लूकमध्ये पाहायला मिळाली. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या बनारसी लेहंग्यामध्ये क्रिती अगदी सुंदर दिसतेय. तिच हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

बनारसी रेशीम चोळीमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनचं सौदर्य खुलून आलंय. या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये.

'celebrated the rich tradition and artistry of bunbkar socity...' असं कॅप्शन तिने या व्हायरल फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय.