'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:च्याच लग्नात केला होता कन्यादानाला विरोध, नक्की काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:43 PM2023-11-30T12:43:36+5:302023-11-30T13:01:59+5:30

कन्यादान आणि पाठवणी न करताच झालं होतं अभिनेत्रीचं लग्न

'रहना है तेरे दिल मे' फेम अभिनेत्री दिया मिर्झाचा (Dia Mirza)मोठा चाहतावर्ग आहे. गोड आवाज आणि सौंदर्याने तिने कायम प्रेक्षकांवर छाप पाडली. पहिल्याच सिनेमातून तिला कमालीचं यश मिळालं.

दोन वर्षांपूर्वी दियाने उद्योगपती वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची तेव्हा खूप चर्चा झाली होती. कारण तिच्या लग्नातील सर्व विधी महिला पुजारीने केल्या होत्या.

दिया पर्यावरवादी आहे. ती नेहमी पर्यावरण बचावासाठी झगडते. दियाच्या लग्नात सर्व वस्तू इकोफ्रेंडली होत्या. प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता.

पण दियाच्या लग्नातील विशेष बाब ही की तिने कन्यादान आणि पाठवणी या दोन विधींना नकार दिला होता. कन्यादान ही अशी प्रथा आहे ज्यामध्ये वडील आपल्या मुलीला दान करतात. दिया या विचाराच्या कायम विरोधात होती.

नुकतंच ती एका मुलाखतीत म्हणाली,'माझे आजोबा म्हणायचे की मुली काही कोणतं सामान नाही की लग्नात दान दिलं जाईल. हा खूपच सशक्त विचार आहे. म्हणूनच माझ्या आईनेही सांगितलं की माझ्या लग्नात कन्यादान होणार नाही.'

दियाच्या या निर्णयाने तिच्यावर प्रचंड टीकाही झाली. पण दियाने अनेक रुढी परंपरांना फाटा देत हा धाडसी निर्णय घेतला. या टीकारांना दीयाने अगदी विनम्र शब्दांत उत्तर दिले.

'लग्न हे दोन जिवांचा आत्मा असतो. या नात्यात प्रेम, आश्चर्य, विश्वास, या गोष्टी असतात. त्यामुळे विधी कोणी केल्या यापेक्षा विधी का करतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मी त्यानुसारच, बदल स्वीकारत मी काही विधींना फाटा दिला तर काही विधी मनापासून केल्या. आजुबाजूला होणाºया बदलांची सुरुवात आपण आपल्या निवडीपासूनच केली पाहिजे.’ असं दिया म्हणाली.