Photos: भरजरी पैठणी अन् कपाळी चंद्रकोर! बॉलिवूड अभिनेत्रीने केलं असं फोटोशूट की मराठी अभिनेत्रीही पडल्या फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:39 IST2026-03-14T12:34:17+5:302026-03-14T12:39:25+5:30

भूमीने पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भूमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.

नुकतंच भूमीने पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

भूमीने पैठणी साडी नेसत त्यावर गुलाबी डिझायनर ब्लाऊज घातल्याचं दिसतं आहे. पैठणीमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

तिच्या ज्वेलरीने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. गळ्यात तिने चोकर आणि एक मोहनमाळ घातली आहे. तर कानात छान कानातले घातले आहेत.

बन बांधत भूमीने खास हेअरस्टाइल केल्याचं दिसत आहे.

कपाळावर चंद्रकोर लावत भूमीने तिचा लूक पूर्ण केला आहे. अगदी साध्या मेकअपमध्येही भूमीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

भूमीचा हा मराठमोळा लूक पाहून चाहतेही खूश झाले आहेत. एका इव्हेंटसाठी तिने हा खास लूक केला होता.

भूमीच्या या मराठमोळा लूक आणि खास अंदाजापुढे मराठी अभिनेत्रीही फिक्या पडतील.