अभिनेत्री अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटिफूल फोटो; अदांवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:31 PM2024-02-13T18:31:01+5:302024-02-13T18:40:02+5:30

अंकिता लोखंडे तिच्या काही बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडियावर अंकिताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतेच अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास फोटो शेअर केले आहेत.

यात अंकिताच्या कातिल अदा पाहून सगळेच फिदा झाले आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे खूपच स्टायलिश दिसते आहे.

फोटोशूटमध्ये अंकिता वेगवेगेळ्या पोज देताना दिसेतय. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. 'पवित्र रिश्ता' मालिकेतून ती घराघरात पोहचली.

बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिका सिनेमामधून पदार्पण केले होते.

तर पती विकी जैनसोबत ती 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाली होती. पण, अंकिताला हा शो जिंकता आला नाही. तिनं 'बिग बॉस १७'च्या टॉप ५मध्ये स्थान मिळवलं होतं.

अंकिता लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमात झळकणार आहे.