लिव्ह इनमध्ये आई झाली, अफेअर्समुळे चर्चेत राहिली, अक्षयची 'ही' अभिनेत्री शोबिझ सोडून कुठे गेली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:50 IST2025-07-30T14:13:02+5:302025-07-30T14:50:32+5:30

लिव्ह इन रिलेशनशिपमधून आई झाली, अफेअर्समुळे झाली सर्वाधिक चर्चा, अक्षयची ही अभिनेत्री शोबिझ सोडून झाली गायब

वयाच्या १६ व्या वर्षी या अभिनेत्रीने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. आपल्या करिअरमध्ये तिने रजनीकांत, अक्षय कुमार, प्रतीक बब्बर तसंच साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत काम केलं आहे. परंतु, ही अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली.

त्यानंतर तिने तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली.

त्यानंतर तिने तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. परंतु, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अभिनेत्री ग्लॅमर विश्वाला रामराम करत परदेशात जाऊन स्थायिक झाली.

'एक दीवाना था' या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात एमी जॅक्सनसोबत त्याची केमिस्ट्री खूपच गाजली. प्रेक्षकांना ही लव्हस्टोरी भलतीच आवडली होती. याचदरम्यान, प्रतीक आणि एमीच्या लिंकअपच्या चर्चा पसरु लागल्या होत्या.

प्रतीक बब्बरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, एमी जॅक्सन ब्रिटीश व्यावसायिक एंड्रियास पानायियोटौ यांचा मुलगा जॉर्जसोबत रिलेशनशीपमध्ये होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर अ‍ॅमी आणि जॉर्ज या दोघांनी २०१९ मध्ये एकमेकांसोबत एंगेजमेंट केली. साखरपुड्यानंतर ८ महिन्यांनी अ‍ॅमीने मुलाला जन्म दिला होता. परंतु त्यानंतर अ‍ॅमी आणि जॉर्ज यांचं ब्रेकअप झालं.

त्यानंतर एमीने ए़डवर्ड वेस्टिकसोबत २०२४ मध्ये एंगेजमेंट केली होती. लगेचच आठ महिन्यानंतर अभिनेत्रीने इटलीतील बिचवर डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या लग्नामध्ये तिचा पाच वर्षांचा मुलगा देखील सहभागी झाला होता. अलिकडेच अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

एमी जॅक्सनचा जन्म ३१ जानेवारी १९९२ रोजी यूकेमध्ये झाला. तिने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने वयाच्या १६ व्या वर्षी 'मिस टीन वर्ल्ड २००९' हा किताब जिंकला.