स्वत: जवळील आहे ती संपत्ती करतोय गरजूंना दान; किती आहे सोनू सूदचं एकूण नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:14 PM2023-07-31T13:14:54+5:302023-07-31T13:24:01+5:30

Sonu sood: सोनू सूद सिनेमासोबतच जाहिराती, ब्रँड इंडोर्समेंटमधून बक्कळ पैसे कमावतो. त्यामुळे त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून त्याच्या जनसेवेसाठी ओळखला जात आहे.

पडद्यावर खलनायिकी भूमिका साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी सुपरहिरो ठरला आहे.

अलिकडेच सोनूने त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्याविषयी अनेक गोष्टी चर्चेत आल्या.

कोविड काळापासून सोनू सूद निस्वार्थपणे लोकांची सेवा करत आहे. अगदी लोकांना व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल देण्यापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत अनेक गोष्टींसाठी तो गरजूंना मदत करत आहे.

५५०० रुपये खिशात घेऊन सोनू सूदने मुंबई गाठली होती. विशेष म्हणजे तोच सोनू सूद आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये सोनू सूदच्या एकूण संपत्तीची चर्चा रंगली आहे. लोकांसाठी अमाप संपत्ती खर्च करणाऱ्या सोनू सूदची संपत्ती किती असेल असा प्रश्न चाहत्यांना पडतो.

सोनू सूद सिनेमासोबतच जाहिराती, ब्रँड इंडोर्समेंटमधून बक्कळ पैसे कमावतो. त्यामुळे त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

सोनू सूदचं अंधेरीमध्ये आलिशान घर आहे. तसंच जुहू परिसरात त्याचं हॉटेलदेखील आहे. विशेष म्हणजे सोनूला महागड्या गाड्यांची विशेष आवड आहे.

सोनू सूद आज तब्बल १३५ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. जवळपास २५ वर्षांपासून तो कलाविश्वात कार्यरत आहे.