किंग खानच्या लेकीची बातच न्यारी! लाल रंगाची साडी नेसून केलं सुंदर फोटोशूट; नेटकरी घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:49 IST2024-09-10T16:42:03+5:302024-09-10T16:49:28+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असते.

सुहाना देखील आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे.
जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
आपल्या चाहत्यांसाठी सुहाना तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
शिवाय तिची सोशल मीडियावर तगडी फॅनफॉलोइंगही आहे.
नुकतेच सुहानाने तिचे अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये लाल रंगाची डिझायनर साडी, मोकळे केस अन् कानात झुमके असा साधा लूक तिने केला आहे.
सुहाना खान आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं सहज जिंकते. दरम्यान, तिचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.