सुपरस्टार दाम्पत्याची लेक, पडद्यावर ठरली सुपरफ्लॉप! आता इंटिरिअर डिझायनर बनून करतेय कोट्यवधींची कमाई, ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:36 IST2025-12-29T16:26:28+5:302025-12-29T16:36:28+5:30

सुपरस्टार दाम्पत्याची लेक, सौंदर्य अन् अभिनयाची चालली नाही जादू, आता इंडस्ट्रीपासून दूर राहून करतेय 'हे' काम

'बरसात', 'मेला', 'बादशाह', 'जब प्यार किसी से होता है' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे ट्विंकल खन्ना.

सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची ती मुलगी आहे. तिचा जन्म मुंबईत २९ डिसेंबर १९७३ रोजी झाला. ट्विंकलनं पांचगणी येथील न्यू एरा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर उच्च शिक्षण नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये झालं.

सुरुवातीच्या काळात तिला यश मिळाले असले तरी ट्विंकलच्या अभिनय कारकिर्दीला तिकीटबारीवर बऱ्याचदा अपयशाला सामारं जावं लागलं.अभिनय क्षेत्रात फारसं यश मिळत नसल्यामुळे ट्विंकल त्यापासून दुरावली. १७ जानेवारी २००१ मध्ये तिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत.

चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर ट्विंकल खन्नाने इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये तिने मुंबईत 'द व्हाईट विंडो' हे तिचे इंटिरियर डिझाइनचे दुकान उघडलं.

ट्विंकलने १९९५ मध्ये बॉबी देओलसोबत 'बरसात' या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. त्याचबरोबर तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

इंटिरियर डिझायनर म्हणून तिने केलेलं काम पाहून अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. कोणतीही प्रोफेशनल डिग्री नसतानाही ट्विंकलने राणी मुखर्जी, रीमा सेन, तब्बू, करीना कपूर यांच्या घराचे इंटेरिअर डेकोरेशन केले आहे.

सध्या ट्विंकल खन्ना सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ती या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करते. मिडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री ३५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.