पडद्यावर 'लालची शेठ', प्रत्यक्षात मात्र...; ९०च्या दशकातील खलनायकाचा दिलदारपणा वाचून डोळे पाणावतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:08 IST2025-09-15T16:48:41+5:302025-09-15T17:08:09+5:30
पडद्यावरचा लालची सेठ गाजला; प्रत्यक्षात परोपकारी व्यक्तिमत्व! ९० च्या काळातील खलनायकाचा दिलदारपणा वाचून डोळे पाणावतील

हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकाची भूमिका गाजवून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे काही मोजकेच अभिनेते होते. त्यातील एक नाव म्हणजे चंद्रशेखर दुबे.
पडद्यावर लालची सेठ, बलात्कारी व्यवसायिक तसेच फसवणूक करणारा दलाल सावकाराच्या भूमिका रंगवल्यात. या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं.
'तिसरी कसम', 'रोटी कपडा और मकान', 'मौसम', 'अंगूर', 'राम तेरी गंगा मैली' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
चंद्रशेखर दुबे यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२४ ला मध्यप्रदेशातील कन्नोड येथे झाला.
१९४६ मध्ये 'जादुई पुतली' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.असंही सांगण्यात येतं की चंद्रशेखर दुबे यांनी वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी १९४२ च्या भारत छोडो चळवळीत सहभाग घेतला, यामुळे त्यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला.
साल १९५३ मध्ये अमिया चक्रवर्तीच्या 'पतिता "या चित्रपटातून, त्यांनी साकारलेल्या बिहूचाचा या खलनायकी भूमिकेने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी रंगवलेला खलनायक इतका वास्तविक वाटत असे की त्या काळातील प्रेक्षक दुबेंची पडद्यावर एन्ट्री होताच त्यांना शिवीगाळ करायचे.
मात्र, अभिनयासह हा नायक त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जायचा.सी.एस.दुबे आपल्या अभिनय कारकिर्दीत चित्रपटातून काम करुन मिळालेल्या मानधनातील विशिष्ट रक्कमे गोर-गरिब मुलांच्या शिक्षणासाठी दान करत असत.प्रत्यक्ष जीवनात परोपकारी व्यक्तिमत्व असणाऱ्या चंद्रकांत दुबे यांचं २८ डिसेंबर १९९३ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.