अमिताभ यांनी ३६ वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस; बॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय?

By देवेंद्र जाधव | Updated: March 12, 2025 13:56 IST2025-03-12T13:36:19+5:302025-03-12T13:56:05+5:30

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा बॉलिवूडच्या क्लासिक सिनेमांमध्ये ओळखला जातो. तुम्ही पाहिलाय?

अमिताभ बच्चन यांचा एक सिनेमा बॉलिवूडमध्ये क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा म्हणजे 'ब्लॅक'.

'ब्लॅक' सिनेमात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या दोघांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमात दिव्यांग मुलगी आणि तिच्या शिक्षकाची हृदयस्पर्शी कहाणी दिसली. राणीने या सिनेमात मिशेल नावाच्या मुलीचं कॅरेक्टर साकारलं होतं.

'ब्लॅक' सिनेमात अमिताभ यांनी देबराज सहानी यांची भूमिका साकारली होती. दिव्यांग असणाऱ्या मिशेलच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं काम देबराज करतो.

'ब्लॅक' सिनेमातील अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या किसिंग सीनचीही चर्चा झाली. हा सीन बॉलिवूडच्या इतिहासातील एक संवेदनशील क्षण म्हणून ओळखला जातो.

२२ कोटींचं बजेट असलेल्या 'ब्लॅक' सिनेमाने ६६ कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाला संमीश्र प्रतिसाद मिळाला असला तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा नावाजला गेला.

पद्मावत, देवदास, बाजीराव मस्तानी फेम दिग्दर्शक संजय लीला भन्सालींनी 'ब्लॅक' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. जाणकार सिनेप्रेमींना हा सिनेमा खूप आवडतो.