'कोई मिल गया'चा 'बिट्टू' इतका बदलला की त्याला ओळखणं झालंय कठीण, आता दिसतो खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:59 IST2025-06-29T12:50:46+5:302025-06-29T12:59:46+5:30

एकेकाळी निरागस दिसणारा बिट्टू आता स्टाईल आयकॉन बनला आहे. त्याच्या स्मार्ट लूक आणि फिट बॉडीमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

एकेकाळी निरागस दिसणारा बिट्टू आता स्टाईल आयकॉन बनला आहे. त्याच्या स्मार्ट लूक आणि फिट बॉडीमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

२००३ मध्ये आलेल्या 'कोई मिल गया' चित्रपटातील तो गोंडस मुलगा जो डोक्यावर पगडी बांधतो आणि 'आयला' म्हणतो तो आता पूर्णपणे बदलला आहे. आता तो मोठा झाला आहे आणि त्याचे ट्रान्सफॅार्मेशन पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

बिट्टूचे खरे नाव अनुज पंडित शर्मा आहे. आता तो मोठा झाला आहे आणि इतका बदलला आहे की लोक त्याला पाहून थक्क होतात.

अनुजला लोक अजूनही प्रेमाने बिट्टू म्हणतात. पण त्याने आता त्याची इमेज पूर्ण बदलली आहे.

अनुज आता खूप स्टायलिश राहतो. बॉडी सर्वकाही परिपूर्ण आणि फिट आहे. आता तो पूर्णपणे स्मार्ट दिसतो.

अनुज अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करतो. कधी तो ट्रेंडी जॅकेटमध्ये दिसतो तर कधी साध्या पण मस्त स्वॅग स्टाईलमध्ये.

अनुजची फिटनेस देखील अप्रतिम आहे. त्याचे शरीर आणि व्यक्तिमत्व पाहता असे दिसते की तो त्याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतो.

'कोई मिल गया' नंतर त्याने 'डरना मन है', 'टोटल सियाप्पा'सारख्या चित्रपटांमध्ये आणि 'परवरिश २' आणि 'क्राइम पेट्रोल' सारख्या अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

डिस्ने + हॉटस्टारच्या 'बामिनी अँड बॉईज' या मालिकेत त्याने मोठी भूमिका साकारली होती आणि तिथेही त्याचा अभिनय आवडला होता.