Birthday Special : कंगना रानौतने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस, गाणं गाऊन शहिदांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:55 IST2020-03-23T17:49:27+5:302020-03-23T17:55:17+5:30
Kangana Ranut celebrates birthday

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने आज 33वा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला.
वाढदिवसाच्या निमित्ताने तिने घरी पूजाअर्चा केली.
कंगनाच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या.
कंगनाच्या वाढदिवसादिवशीच शहिद दिवसदेखील असतो. त्यामुळे तिने शहीद भगत सिंग यांना श्रद्धांजली वाहिली
कंगनाची बहिण रंगोली चंदेलने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ज्यात कंगना गाणं गाताना दिसते आहे.
व्हिडिओमध्ये कंगनाने म्हटले की, आज मला माझे मित्र, नातेवाईक व सिनेइंडस्ट्रीकडून शुभेच्छा मिळत आहे. खूप जास्त प्रेम मिळत आहे.त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण क्रांतीकारी भगत सिंग, राजगुरू व सुखदेव शहीद झाले होते. त्यांच्यासाठी कैफी आझमी यांनी लिहिलेली काही ओळ गाणार आहे.
कंगनाने कैफी आझमी यांनी लिहिलेले प्रसिद्ध गाणे अब तुम्हारे हवाले वतन साथियों हे गायले.