"मी किती अन् कशाकशाला नाही म्हणणार?"; भूमी पेडणेकरने सांगितली बॉलिवूडची दुसरी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:14 IST2026-02-12T19:43:51+5:302026-02-12T20:14:17+5:30

Bhumi Pednekar on Bollywood Film: "मी आधी ३००-३५० कोटींचे बजेट असणारे सिनेमे मी नाकारले कारण..."

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी ग्लॅमरपेक्षा भूमिकेला अधिक महत्त्व देते. 'दलदल' या वेब सीरिजमध्ये तिने 'रीटा फरेरा' ही तडफदार पोलिसाची भूमिका साकारली आहे.

भूमीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला अनेकवेळा मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, ज्यांचे बजेट ३०० कोटींहून अधिक होते, परंतु तिने त्या नम्रपणे नाकारल्या. त्यामागचे कारण काय हेदेखील तिने स्पष्ट केले आहे.

भूमीने नेहमीच आव्हानात्मक भूमिकांना पसंती दिली आहे. 'दम लगा के हईशा', 'सोनचिरैया' किंवा आताची 'दलदल' असो, तिला अशा कथा हव्या असतात जिथे ती आपल्या अभिनयाची छाप सोडू शकेल.

भूमीने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "सुरुवातीच्या काळात मोठ्या बॅनरसोबत काम करणे गरजेचे वाटते, पण आता मात्र मी माझ्या अटी-शर्तींवर भूमिकेची निवड करते आणि चित्रपट निवडते."

"अभिनेत्रीला केवळ गाण्यापुरते किंवा शो-पीस म्हणून वापरले जाणार असेल तर तशा चित्रपटांचा भाग व्हायचे मला अजिबात इच्छा नाही. केवळ मोठे स्टार्स आहेत म्हणून मी चित्रपट स्वीकारत नाही."

"मीदेखील ३००-३५० कोटींचे चित्रपट नाकारलेत. पण मी तरी किती आणि कशाकशाला नाही म्हणणार? मलाही घर चालवायचंय आणि माझं करियरही सुरु ठेवायचंय."

"पण अशा चित्रपटांमध्ये काम करून मला फक्त एक 'हिट' चित्रपट मिळाला असता, पण समाधान मिळाले नसते. म्हणूनच मी असे चित्रपट नाकारते" असे भूमी पेडणेकर हिने स्पष्टपणे सांगितले.