सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीचं 'बिकिनी' फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:41 IST2026-02-14T14:07:16+5:302026-02-14T14:41:12+5:30

सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट चर्चेत

'दृश्यम' सिनेमा सर्वांनी पाहिलाच असेल. या सिनेमात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री श्रिया सरनने साकारली. श्रियाने केलेलं हॉट फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे

श्रिया सरन नुकतंच पती आणि लेकीसोबत मालदीव्हसला गेली आहे. त्या ठिकाणी समुद्रकिनारी श्रियाने कुटुंबासोबत चांगलाच वेळ घालवला.

श्रिया सरन या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी श्रियाने जपलेला फिटनेस आणि तिचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

श्रिया सरनची लेकही यावेळी दिसून आली. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून श्रियाने कुटुंबासोबत निवांत क्षण घालवले.

बिकिनी परिधान करुन श्रिया सरनने समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट केलं. श्रियाच्या सौंदर्याचं आणि अदांचं तिच्या चाहत्यांनी चांगलंच कौतुक केलं आहे.

श्रिया सरन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये अभिनय करत आहे. दृश्यम सिनेमातील श्रियाने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली.

श्रिया सरन लवकरच 'दृश्यम ३' मधून आपल्या भेटीला येणार आहे. २ ऑक्टोबर २०२६ ला श्रिया सरनचा हा सिनेमा रिलीज होणार आहे.