अरबाज खानचं पत्नी शूरा खानसोबत रोमँटिक फोटोशूट, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 18:16 IST2024-11-26T18:13:06+5:302024-11-26T18:16:26+5:30
Arbaaz Khan And Shura Khan : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांनी नुकतेच काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांनी नुकतेच काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
अरबाज खान आणि शूरा खानने नुकतेच त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कपल पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.
पीच रंगाच्या नेट साडीत शूरा खान कमालीची सुंदर दिसत आहे. शूराने साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज घातला.
कानात झुमके आणि हातात ब्रेसलेट घालून तिने तिचा देसी लूक पूर्ण केला. फोटोंमधील तिचे हास्य तिच्या सौंदर्यात भर घालत होते.
मोकळ्या केसांनी आणि कमीतकमी मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे, शूरा खानने जबरदस्त फोटोशूट केले आहे.
अरबाज खानही ऑफ व्हाइट कुर्त्यामध्ये छान दिसत होता. त्याने ब्राऊन शूजसह त्याच्या लुकला क्लासी टच दिला.
फोटोंमध्ये अरबाज पत्नी शूरावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
फोटोंमध्ये अरबाज शूरासोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
फोटो शेअर केल्यानंतर कपलने कॅप्शनमध्ये लिहिले - 'जस्ट बीइंग यू.' त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.