अखेर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लेक वामिकाचा फोटो आला समोर, चाहते झाले क्रेझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:32 IST2022-01-24T13:32:43+5:302022-01-24T13:32:43+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लेक वामिकाचा अखेर फोटो समोर आला आहे.
भारत आणि साउथ आफ्रिकामध्ये तिसरा वनडे सामना सुरू होता. अनुष्का शर्मा स्टॅण्ड्समध्ये लेक वामिकासोबत उभी होती. त्यावेळी वामिकाची झलक पाहायला मिळाली.
अनुष्का शर्माच्या कडेवर वामिका पिंक ड्रेसमध्ये दिसते आहे.
चाहत्यांनी वामिकाला मिनी विराट असे संबोधले आहे.
अनुष्का शर्माची लेक वामिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आतापर्यंत विराट कोहली आणि अनुष्का शर्माने लेक वामिकाला जगाच्या नजरेपासून वाचवून ठेवले होते. यावेळी इच्छा नसतानाही कॅमेरा वामिकापर्यंत पोहचला.
या फोटोत अनुष्का शर्मा लेक वामिकाची खूप काळजी घेताना दिसत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लेक वामिकाचा फोटो पाहून चाहते खूपच खूश झाले आहेत.