अनुष्का शर्माचे मॉडेलिंगच्या दिवसातील फोटो होत आहेत व्हायरल, पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 16:12 IST2021-01-29T15:57:48+5:302021-01-29T16:12:25+5:30
त्या दिवसांत अनुष्का इतकी वेगळी दिसायची की, तिचे फोटो पाहून तिला कुणीही ओळखणार नाही.

अनुष्का शर्मा नुकतीच आई झाली. अलीकडे तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तूर्तास अनुष्काचे मॉडेलिंगच्या दिवसातील काही फोटो व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनुष्का मॉडेल होती. मॉडेलिंगपासून सुरू झालेला अनुष्काचा प्रवास बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला.

गेल्या काही वर्षात अनुष्काने स्वत:ला बरेच बदलले, प्रचंड संघर्ष करून, कष्टाने आपले स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले.

अनुष्काने बरीच वर्षे मॉडेलिंगमध्ये घालवलीत. त्या स्ट्रगल पीरियडमधील अनुष्काला आज ओळखणेही कठीण आहे.

त्या दिवसांत अनुष्का इतकी वेगळी दिसायची की, तिचे फोटो पाहून तिला कुणीही ओळखणार नाही.

वयाच्या १५ व्या वर्षांपासून अनुष्काने आपल्या मॉडेलिंगची सुरूवात केली होती. यानंतर पाच वर्षे ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात होती.

पाच वर्षे स्ट्रगल केल्यानंतर अनुष्काला पहिला चित्रपट मिळाला. विशेष म्हणजे, पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली.

हा चित्रपट होता ‘रब ने बना दी जोडी’. या चित्रपटानंतर मात्र अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजची अनुष्का तुमच्यासमोर आहेच.

आज अनुष्का अभिनेत्री आहे, निर्माती आहे, शिवाय तिचा एक क्लोदिंग ब्रँडही आहे.

गत काही वर्षांत बॉलिवूडमध्ये तिने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज बी-टाऊनच्या ए-लिस्ट अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतल्या जाते.
















