‘तू याला केमिस्ट्री म्हणतेस?’; अंकिता लोखंडेनं शेअर केले रोमॅन्टिक फोटो, पुन्हा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:26 IST2022-05-13T12:16:25+5:302022-05-13T12:26:00+5:30

Ankita Lokhande, Vicky Jain Romanitc Photos: टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा पल्ला गाठणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या रोमॅन्टिक फोटोंची.

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा पल्ला गाठणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या रोमॅन्टिक फोटोंची.

होय, अंकिताने पती विकी जैनसोबत एक रोमॅन्टिक फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत अंकिता विकीसोबत एकापेक्षा एक रोमॅन्टिक पोझ देताना दिसतेय.

दोन लोकांमधली केमिस्ट्री एक वेगळंच सायन्स असतं..., असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. अर्थात अंकितानं हे फोटो शेअर केले म्हणजे काही जण तिला ट्रोल करणारच. तुम्ही दोघं फेक आहात. प्रत्येकवेळी तुम्हाला अटेंन्शन हवं असतं, अशा शब्दात काहींनी दोघांना ट्रोल केलं.

होय,काहींना अंकिता व विकीचा हा रोमॅन्टिक अंदाज खूप आवडला आहे. पण काहींनी नेहमीप्रमाणे यावरून अंकिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तिची तुलना थेट कंगनाशी केली आहे.

केमिस्ट्री ही लोकांना आवडला हवी आणि तुझी केमिस्ट्री फक्त सुशांतसोबत होती. तू याला केमिस्ट्री म्हणतेस? अशी कमेंट एका युजरने या फोटोंवर केली. सुशांतला विसरलीस का? अशी कमेंट करत एका युजरने तिला डिवचलं.

तू कंगना आणि हा आदित्य पांचोली वाटतोय, अशी कमेंट एका ट्रोलरने केली. काही चाहत्यांना मात्र अंकिता व विकीची केमिस्ट्री चांगलीच भावली आहे. त्यांनी दोघांचे कौतुक केलं आहे.

17 तासांत अंकिता व विकीच्या या फोटोंना 1 लाखांवर लोकांनी लाईक्स केलं आहे. अंकिता व विकीने गतवर्षी डिसेंबर महिन्यात विकीसोबत लग्नगाठ बांधली होती. या लग्नाचीही जोरदार चर्चा झाली होती.

विकीआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर 2018 मध्ये अंकिताच्या आयुष्यात विकीची एन्ट्री झाली होती.

अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं.