Ankita Lokhande अंकिता लोखंडेचं आणखी एक फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या क्लासी पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 16:57 IST2022-11-24T16:51:09+5:302022-11-24T16:57:00+5:30

Ankita Lokhande : टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला चर्चेत राहणं चांगलंच जमतं.

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला चर्चेत राहणं चांगलंच जमतं.

या ना त्या कारणानं ती सतत चर्चेत असते. कधी ग्लॅमरस फोटो, कधी नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ ती शेअर करत असते.

सध्या तिच्या अशाच रोमॅन्टिक फोटोंची चर्चा आहे. होय, अंकिताने नवऱ्यासोबत रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत.

मरून कलरच्या ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

या ड्रेसमध्ये अंकिता कमालीची हॉट दिसतेय. तिचे फोटो पाहून चाहतेही क्रेझी झाले आहेत.

थाई-हायस्लिट ड्रेसमध्ये अंकिता टोन्ड लेग्स फ्लॉट करताना दिसतेय. तर तिचा पती विकीने ब्रँडेड व्हाईट हुडी व मॅचिंग पँट कॅरी केला आहे.

अंकिताचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अंकिता व विकी जैन यांनी गतवर्षी 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.

अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे.

विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं.