नव्या वधूप्रमाणे नटून थटून अंकिता लोखंडेने साजरा केला करवाचौथ, फोटो पाहून फॅन्स म्हणाले- चाँद नजर आया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 12:54 IST2020-11-05T12:45:50+5:302020-11-05T12:54:13+5:30
अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील ४ नोव्हेंबरला करवाचौथ साजरा केला.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील ४ नोव्हेंबरला करवाचौथ साजरा केला.
यावेळी ती नव्या वधूसारखी दिसत होती.
तिचे लाल रंगाच्या साडीतील सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अंकिता लौखंडेने परिधान केलेली साडी कल्की फॅशन ब्रॅण्डची होती.
अंकितासाठी साडी सिलेक्ट करण्यासाठी आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी फॅशन स्टायलिस्ट अनुराधा खुरानाने मदत केली होती. यासाठी अंकिताने तिचे सोशल मीडियावर आभारही मानले.
अंकिता लोखंडे या फोटोंवर फक्त चाहतेच नाही तर काही सेलिब्रेटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत.
एका व्यक्तीने तर तिला चंद्राची उपमा देत चाँद नजर आया अशीदेखील कमेंट केली आहे.
अंकिताच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
अंकिताच्या या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिचा कुत्रादेखील दिसतो आहे.