अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा'चा फर्स्ट लूक झाला रिलीज, वाढदिवसादिवशी शेअर केला पोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:27 IST2020-04-09T18:10:58+5:302020-04-09T18:27:07+5:30
Allu Arjun

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नुकताच त्याचा 37वा वाढदिवस साजरा केला.
त्याच्या वाढदिवसादिवशी त्याने आगामी चित्रपट पुष्पाचे पोस्टर लाँच केले.
अल्लू अर्जुनने पुष्पा चित्रपटाची घोषणा केली आहे.
त्यासोबतच त्याने हिंदीतही पोस्टर शेअर केला आहे. हा चित्रपट हिंदीतही येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत.
यापूर्वीही दिग्दर्शक सुकुमार व अर्जुन अल्लूने आर्य आणि आर्य 2मध्ये काम केले आहे.
पुष्पाच्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन रागात दिसतो आहे.
अल्लू अर्जुनचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.